इतर

कोल्हापूर एलसीबीचा पोलीस महासंचालकांकडून सत्कार

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर –  चंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोडामार्ग रोडवर २९ मे रोजी दाट झाडीत सडलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह मिळून आला होता. या प्रकरणी अज्ञाता विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अथक परिश्रम घेत गुन्हयाची उकल करून बेळगाव जिल्ह्यातील एका महिलेसह चार आरोपींना अटक केली होती.

या कामगिरीबद्दल आज मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार प्रवीण पाटील यांच्यासह सर्व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

संबंधित विषय

Scroll to Top