मुंबई – देशातील बलाढ्य टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्जमध्ये वाढ होणार असल्याचे संकेत भारती एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी एका मुलाखती दरम्यान दिले आहे. यामुळे पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्यांचा दणका ग्राहकांना बसणार असल्याची शक्यता आहे.
भारती एअरटेलचे संस्थापक सुनील भारती मित्तल यांनी ग्राहकांना लवकरच अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत. ‘दररोज १०-१२ रुपयांचा खर्च परवडण्याजोगा आहे, त्यामुळे मोबाईल सेवांचे दर प्रति वापरकर्ता ३५० रुपये प्रति महिना इतके वाढायला हवे’, असं मत ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी मोबाईल सेवांचे दर वाढवण्याचे समर्थन केलं आहे.




