सहकार

गोकुळ दूध संघाच्यावतीने ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देणे आणि उत्पादकांचा सन्मान करणे हा उद्देश ठेवून गोकुळ दूध संघाच्यावतीने दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी आणि म्हैशींसाठी प्रतिष्ठेची गोकुळ श्री’ या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही स्पर्धा २१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कोणत्याही दिवशी घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक दूध उत्पादकांनी १२ नोव्हेंबरपर्यंत संघाच्या बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ आणि ताराबाई पार्क येथील कार्यालयात नोंदणी करावी. सहभागी होणाऱ्या दूध उत्पादकांच्या म्हैशीने किमान १२ लिटर आणि गायीने किमान २० लिटर प्रतिदिन दूध देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन गोकुळच्यावतीने करण्यात आले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top