राजकीय

आमदार हर्षदा देशमुख- जाधव यांनी आ. सतेज पाटील यांची सदिच्छा भेट घेत मानले आभार…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

युवकांच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडी कटिबद्ध राहील : आ. हर्षदा देशमुख – जाधव

कोल्हापूर – विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा देशमुख – जाधव या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर नूतन आमदार हर्षदा देशमुख – जाधव या आज कोल्हापुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी आ.सतेज पाटील यांची भेट घेत विधानपरिषद निवडणुकांमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उभारलेला देशव्यापी लढा, स्पर्धा परीक्षार्थींच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडीने केलेला संघर्ष तसेच युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर सातत्याने केलेली आंदोलने या मुद्द्यांमुळे हा विजय मिळवता आल्याचं त्यांनी सांगितलं.. युवकांच्या प्रश्नांसाठी आणि पदवीधर मतदारांच्या अपेक्षांसाठी आगामी काळातही महाविकास आघाडी कटिबद्ध राहील. असा विश्वास आमदार हर्षदा देशमुख- जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, सुर्यकांत बुद्याळकर, गोपाळराव पाटील, सचिन चव्हाण, अनिल घाटगे, सरलाताई पाटील, भारतीताई पवार, भरत रसाळे यांच्यासह नगरसेवक , विविध सेलचे पदाधिकारी, आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top