नवी दिल्ली – निवडणूक आयुक्त नियुक्त करताना राजकीय हस्तक्षेप होणार नाही अशी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. निवडणुका निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत. मतदानाच्या माध्यमातून आपण सत्ताबदल घडवून आणू शकतो, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले आहे.
अभय ओक म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे प्रत्येक नागरिकाला जे पटतील ते विचार आणि मुद्दे मांडण्याचा पूर्ण अधिकार असणे हा आहे. एखाद्या मुद्द्याचे उत्तर मुद्द्यानेच दिले पाहिजे, ते गुद्द्याने देता कामा नये देशातील लोकशाही टिकवायची असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकले पाहिजे; अभिव्यक्ती स्वातंत्र्याशिवाय अर्थपूर्ण जगता येत नाही.




