समाजवादी पार्टीची मागणी
कोल्हापूर – पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी आज मतदानाचा हक्क बजावताना मतदान केंद्रात पक्ष आणि चिन्हाचा स्कार्प घालून मतदान केले. हा निवडणूक अधिनियम 1951 कलम 130 चा भंग आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी अपात्र ठरवून उरलेल्या उमेदवारामधून अधिक मतदान असणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित करावे, अशी मागणी समाजवादी पार्टी प्रदेश सचिव साथी शिवाजीराव परुळेकर यांनी पत्रकाव्दारे केली आहे
निवडणूक आयोगाने या घटनेची दखल घेतली नाही तर, निवडणूक आयोगाच्या विरोधात जन आंदोलन उभा करून प्रसंगी न्यायालयाचं दार ठोठावू, असा इशारा शिवाजीराव परुळेकर यांनी दिला आहे.




