मुंबई – अभिनेता टायगर श्रॉफच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासाठी ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन, अमीर खान, सलमान खान आदींच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अभिनेता अक्षय कुमारने तर बुलेटप्रूफ काचा लावण्याचे काम सुरू केले आहे. तसेच अक्षय कुमारच्या घराची आरोपींनी रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अभिनेत्यांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.




