यंदाचा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर

कोल्हापूर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या ४ ऑक्टोबर रोजी देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देवून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना सहपत्नीक गौरवण्यात येणार आहे. मोहन जोशी यांनी मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये अनेक दशके आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कलाप्रवासाची दखल घेवून त्यांना संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार राजेश दामले घेणार आहेत.

Scroll to Top