कोल्हापूर – सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत मोठा सावळा गोंधळ सुरु आहे. त्यामुळे याचा परिणाम एसआयआरवर होत आहे. असे असताना कर्नाटकमध्ये तब्बल 15 हजार मतदारांची नावे हटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आ. सतेज पाटील यांनी ट्वीट करून मोठा दावा केला आहे.
आ. सतेज पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे कि, अवघ्या तीन दिवसांत 15 हजार मतदारांची नावे हटवण्यासाठी हालचाली होत असतील, तर हा प्रकार वरिष्ठ अधिकारी आणि निवडणूक यंत्रणेच्या संगनमताशिवाय शक्य आहे का? याचा हिशेब आयोगाला द्यावाच लागेल. मतदारांचा अधिकार हिरावून घेणाऱ्या वोटचोरांविरोधात काँग्रेस शेवटपर्यंत संघर्ष करेल.
अवघ्या तीन दिवसांत 15 हजार मतदारांची नावे हटवण्यासाठी हालचाली होत असतील, तर…: आ. सतेज पाटील




