‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या मुलानं मराठी सिनेसृष्टीतून घेतला ब्रेक…

मुंबई – 90च्या दशकांत आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा दिग्गज अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने मराठी सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा आशयाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडिया हँडलवरुन पोस्ट केला आहे. या निर्णयामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.
त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे कि, “मी करिअरमधून थोडा ब्रेक घेतोय…एक स्टार्टअप सुरु करण्याचा विचार करतोय. या पुढच्या प्रवासासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे.” असे त्याने म्हटले आहे.

Scroll to Top