कोल्हापूर – राज्यासह जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. अशात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील धरणांमध्ये १०० टक्के धरणसाठा उपलब्ध असतानाही प्रशासनाने शेतकऱ्यांवर पाणी उपसाबंदी लादल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांच्याच जमिनीत धरणे बांधून शेतकऱ्यांची पिके वाळविली जात आहेत आणि कारखाने, कंपन्यांना मुबलक पाणी दिले जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करून केला आहे.




