मुंबई – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच दुष्काळाच्या संकटात विचार करून दरवर्षी होणारा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे एसटी कर्मचारी संपाच्या पवित्र्यात आहेत.
आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी ऐन दिवाळीत 6 नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.




