ब्रेकिंग न्यूज
आंदोलन

२२ ऑक्टोबरपासून राज्यातील साखर कामगारांचा बेमुदत संप…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

इचलकरंजी – महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आता कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्यावतीने २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. या संपाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील साखर कारखान्यांना भेटी दिल्या. यावेळी कारखान्यांतील कामगारांशी संवाद साधत संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम १९४७ संदर्भातील कायदेशीर तरतुदी पूर्ववत कराव्यात, साखर कामगारांचे थकीत वेतन तातडीने द्यावे, तसेच बंद आणि आजारी साखर कारखाने पुन्हा सुरू करून तिथल्या कामगारांचे पुनर्वसन करावे, अशा प्रमुख मागण्या कामगार संघटनांनी केल्या आहेत. याशिवाय साखर उद्योगातील रोजगार आणि कंत्राटी कामांवर असलेल्या कामगारांना कारखान्याच्या सेवेत सामावून घेऊन त्यांना वेतनश्रेणी लागू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी ५ ऑक्टोबरला कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री आणि सहकारमंत्री या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे २२ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील साखर कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्धार संघटनांनी केला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top