ब्रेकिंग न्यूज
मनोरंजन

कोल्हापूरशी नानांचं असंही नातं…

एस न्यूज प्रतिनिधी अपडेट: 8 October 2026, 4:26 PM 1 मिनिटे वाचन
शेअर करा

तिथं नानांची आमची नाळ जुळली ती कायमचीच : अमर जाधव

कोल्हापूर – ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अचानक जाण्याने चित्रपट सृष्टीसह सर्वांना धक्का बसला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. अभिनेते नाना पाटेकर यांचे कोल्हापूरशी अनोखे आणि आगळेवेगळे असे नाते होते. याबाबत गंगावेशमधील अमर जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गंगावेश परिसरात राहणारे अमर जाधव आणि त्यांचे कुटुंबीय हे अभिनेते नाना पाटेकर यांच्या कुटुंबातील एक सदस्य होते. दरवर्षी नानांच्या मुंबई आणि पुण्यातील घरी गणेशोत्सवासह विविध कौटुंबिक सोहळ्यात जाधव कुटुंबीय सहभागी होतात. नानांनी अमर जाधव यांना वैद्यकीय सेवेसाठी मारुती व्हॅन आपल्या स्वखर्चातून दिली आहे. तसेच नाना प्रेमी विचार मंच या नावाने अमर जाधव आणि त्यांचे सहकारी आरोग्य सेवेसह अनेक मदत कार्य करत आहेत.
नानांच्या निधनावर बोलताना अमर जाधव म्हणाले की, युगपुरुष या चित्रपटासाठी कोल्हापुरात नाना पाटेकर 1997 साली आले होते. त्यावेळी रंकाळा तलाव नजीकच्या अशोक हॉटेलमध्ये आम्ही प्रथम भेटलो आणि तिथं त्यांच्याशी आमची नाळ जुळली ती कायमचीच. त्यांचा मुलगा मल्हार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी आमचा घरोबा असल्याने आमचा घरचा वडीलधारी माणूस गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top