मनोरंजन

‘हा’ अभिनेता गंभीर आजाराशी देत होता झुंज…लवकरच करणार अभिनय क्षेत्रात पुनरागमन

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – ‘आभाळमाया’, ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘दुर्वा’ आणि ‘तू माझा सांगाती’ यासारख्या अनेक मालिकांसह मराठी मनोरंजनविश्वात आपला ठसा उमटवलेला अभिनेता आविष्कार दारव्हेकर गेल्या काही दिवसांपासून गंभीर आणि दुर्मिळ आजाराशी झुंज देत होता. त्यामुळे मनोरंजनविश्वात तब्बल 3 ते 4 वर्ष दिसलाच नाही. एका मुलाखती दरम्यान त्याने, आपल्या आजाराचा खुलासा केला आहे.
त्याला दुर्मिळ त्वचारोगाने ग्रासले होते. हा आजार त्याच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरला. या आजारामुळे त्याच्या शरीरावरील त्वचा फाटण्यास सुरुवात झाली होती. तसेच शरीरावर वेदनादायी फोड येत होते आणि त्यातून रक्तस्रावही होत होता.
आविष्कारची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तब्बल अडीच महिने तो रुग्णालयात उपचार घेत होता. अनेक डॉक्टरांच्या टीमने त्याच्यावर उपचार केले. या काळात त्याला प्रचंड शारीरिक त्रास सहन करावा लागला. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आणि योग्य उपचारांमुळे हळूहळू त्याची प्रकृती सुधारू लागली. अखेर या दुर्मिळ आजारातून बाहेर पडण्यात त्याला यश आले आहे. आता गंभीर आजारावर मात केल्यानंतर आविष्कार पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय होण्याच्या तयारीत आहे.

संबंधित विषय

Scroll to Top