मनोरंजन

‘या’ कारणासाठी ‘रामायण’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची हिंदू संघटनेची मागणी

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणातील मूळ कथेत बदल केल्याचा आरोप

मुंबई – ‘रामायण’ चित्रपट देशासह परदेशातील बॉक्स ऑफिसवर गाजत असताना मुंबईच्या हिंदू संघटनांनी कथानक आणि पात्रांच्या चित्रणावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे नवा वाद समोर आला आहे.
‘रामायण’ चित्रपटात महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणातील मूळ कथेत बदल केल्याचा आरोप केला आहे. तसेच प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहू नये, असे आवाहन करत त्यांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.
चित्रपटात भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि रावण या पात्रांचे चित्रण वाल्मिकी रामायणातील वर्णनापेक्षा वेगळ्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक सुनील घनवट यांनीही चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top