मनोरंजन

गोकुळला सावरण्यासाठी संचालकांची गरज; मात्र महायुतीचे संचालक देशभर पर्यटनात मग्न?

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – प्रशासकीय कालावधीत गोकुळ दूध संघाला २८ कोटी रुपयांचा तोटा झाल्याची चर्चा असताना संघासमोर आर्थिक आव्हानांचा डोंगर उभारला आहे. अशा परिस्थितीत संघाला सावरण्यासाठी आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी निवडून आलेल्या संचालकांनी प्रत्यक्ष कामाला लागणे अपेक्षित आहे.

मात्र, दुसरीकडे महायुतीचे निवडून आलेले काही संचालक देशभर फिरून पर्यटनाचा आनंद घेत असल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे गोकुळच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त होत असताना दुसरीकडे संचालकांच्या या दौऱ्यांमुळे चर्चेला उधाण आले आहे. गोकुळला सावरण्याची जबाबदारी कोण घेणार, पर्यटन की संघाच्या कारभाराला प्राधान्य? असा सवाल आता दूध उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे. गोकुळसमोर आर्थिक शिस्त, दूध उत्पादकांचे हित, संघाचा कारभार आणि तोट्यातून बाहेर पडण्याचे मोठे आव्हान आहे. अशा वेळी संचालकांनी संघाच्या हिताला प्राधान्य देऊन कामकाजात सक्रिय सहभाग घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित विषय

Scroll to Top