मुंबई – नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचा पराक्रम पाहुण महाराष्ट्र हादरला. या भोंदूबाबावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ असा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अशोक खरातची भूमिका कोण साकारणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. अखेर पडदा उठला आहे. अभिनेते मनोज जोशी हे अशोक खरातची भूमिका साकारत आहे
या सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज पहायला मिळत आहे. या चित्रपटात दिपाली सय्यद, सुबोध भावे आणि उदय टिकेकर यांची महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमात अशोक खरातचा डायलॉग देखील ऐकायला मिळत आहे.




