…निर्णय न घेतल्यास पुणे शहर बंद पाडू : आ. रोहित पवार यांचा इशारा

आता राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात : आ. रोहित पवार

पुणे – आज होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय न घेतल्यास पुणे शहर बंद पाडू, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे कि,परवा संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला आहे. पण मुख्यमंत्र्यांना राजीनामा पाठवून काही होणार नाही. भीमनवार यांनी आपला राजीनामा राज्यपालांना पाठवायला हवा होता. आता हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांना एकच भीती आहे की, आता जर भीमनवार यांचा राजीनामा घेतला तर उद्या सामान्य लोक कोणाचाही राजीनामा मागतील. उद्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामाही मागितला जाऊ शकतो. त्यामुळे आता हा सगळा खेळ इगोचा झाला आहे. भीमनवार यांनी राज्यपालांकडे राजीनामा देणे अपेक्षित होते. पण शेवटी मित्र सत्तेत आहे, मुख्यमंत्री आहे. त्यामुळे भीमनवार यांनी खेळी खेळली असावी. मी राजीनामा दिलाय, मी यात नाही, तुम्हाला मला वाचवायचं आहे. त्यांनी हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे, आजच्या कॅबिनेटममध्ये भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर आज निर्णय घेतला नाही तर आम्ही पुणे बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Scroll to Top