५० हून अधिक खासदारांचा मोर्चात सहभाग
नवी दिल्ली – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भव्य दिव्य मोर्चा काढला आहे. या मोर्चात १५० हून अधिक खासदार हातात फलक घेवून सहभागी झाले आहेत.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद भवन परिसरात तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यास सुरुवात केली असून या मोर्चानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट हे सर्व खासदार घेणार आहेत. यावेळी खासदार आपली भूमिका राष्ट्रपतींसमोर मांडणार आहेत.
या मोर्चात खासदार प्रियंका गांधी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे, मल्लिकार्जुन खरगे, संजय राऊत, अरविंद सावंत, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, अनिल देसाई, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह अनेक खासदार सहभागी झाले आहेत.




