निवडणूक आयोग आमच्याबरोबर असेल तर आम्ही वाटेल ते करू, असा कारभार सध्या सुरूय : राज ठाकरेंचा घणाघात

मुंबई – तुम्ही सत्तेत बसलाय याचा आम्हाला राग नाही. मात्र तुम्ही सत्ता कशी चालवताय याचा आम्हाला राग आहे. मनमानी कारभार सुरू आहे. एकाच उद्योगपतीला देशातील जंगले, बंदरे दिली जात आहेत. निवडणूक आयोग आमच्याबरोबर असेल तर आम्ही आम्हाला वाटेल ते करू, असा राज्य आणि केंद्र सरकारचा कारभार सुरू असल्याचा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. विराट ‘गर्जना’ मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.

महाराष्ट्रातील एसआयआर संपूर्णपणे रद्द झालाच पाहिजे. मतदान बॅलेट पेपरवरच झाले पाहिजे, अशी मागणी करत राज ठाकरे म्हणाले की, २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संपूर्ण बहुमत भाजप आणि शिंदेंना मिळाले. निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात जल्लोष नव्हता, शांतता होती. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांत ४० ते ६० लाख मतदार वाढले. हे कसे घडले, असा सवाल त्यांनी केला. आज भाजप सत्तेत आहे, उद्या दुसरा पक्ष सत्तेत आल्यावर भाजपने केली तशीच सत्ता राबवली तर तुम्ही कोठे जाल, असा सवालही त्यांनी केला.

Scroll to Top