ज्ञानेश कुमारांची नेमणूक पक्षपातीपणाने : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई – निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमारांची नेमणूक पक्षपातीपणाने झाली आहे. ज्ञानेश कुमार उद्या निवृत्त झाले तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. ही कोणती लोकशाही आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते विराट ‘गर्जना’ मोर्चाच्या प्रसंगी बोलत होते.
जे स्थानिक पातळीवर वैध अवैध ठरवण्याचा अधिकार असताना ते ठरवण्यासाठी दिल्लीत जातात. बीएलओ वगैरे जाणार. ते ज्ञानेश कुमार ठरवणार? देश काय ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का? असा घणाघात करत उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांनी चोरी केली तरी काही नाही. पोलीस आपलेच आहे. नेमणूक पक्षपातीपणाने, शिवाय संरक्षणही आहे. हा मनमानीपणा सहन केला जाणार नाही.

Scroll to Top