नवी दिल्ली – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी प्रत्येक निवडणुकीत गोंधळ घातला आहे, हे थेट देशविरोधी कृत्य आणि संविधानावर झालेला हल्ला आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांनी एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केली आहे.
देशातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या प्रकरणात जे-जे आरोपी असतील, ज्यांनी ज्यांनी मतं चोरली, त्यांना आज ना उद्या शिक्षा होणारच आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘वोट चोरी’ आणि मतांची हेराफेरी सुरू आहे. मतदाराचे मत योग्य ठिकाणी जाते की नाही, हे तपासण्याची मुख्य जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची होती. त्यांनीच प्रत्येक निवडणुकीत गोंधळ घातला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.




