आजपासून पुढील चार दिवस जिल्ह्यात पावसाच्या सरी…

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यासह घाट माथ्याला आजपासून पुढील चार दिवस मुंबईच्या हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा पावसाच्या सऱ्यांना सुरुवात होणार आहे. या पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावणार आहे.
बंगालच्या उपसागरातील हवामान बदलांमुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. त्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचे पुनरागमन होत असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Scroll to Top