कोल्हापूर – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज आणि उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. परंतु त्यांची तब्येत खराब झाल्याने त्यांनी कोल्हापूर दौरा रद्द केला आहे. ते हुबळी येथून दिल्लीच्या दिशेने परस्पर रवाना झाले आहेत.
डॉक्टरांनी अमित शाह यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे. हुपरी येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात महालक्ष्मी ग्रीन एनर्जी प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार होते. हुपरीतील कार्यक्रमासाठी आमदार राहुल आवाडे यांच्याकडून मोठी तयारी करण्यात आली होती. अमित शहा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता.
‘या’ कारणामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा कोल्हापूर दौरा रद्द..!




