बॅरिकेटिंग तोडून हिंदुत्ववादी संघटनांनी पंचगंगा नदीत केलं गणेश मूर्तींचं विसर्जन…पोलिसांबरोबर बाचाबाची

कोल्हापूर – पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पाणी प्रदुषणाच्या कारणास्तव महापालिकेने कालपासून पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेटिंग लावले आहेत. परंतु आम्ही नदीतचं मूर्ती विसर्जित करणार असा ठाम निर्धार करत हिंदुत्ववादी संघटनांनी बॅरिकेटिंग तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी बॅरिकेटिंग तोडून गणेश मूर्तीचे नदीत विसर्जन केले. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Scroll to Top