इचलकरंजीत ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन… चार मंडळांवर गुन्हे

इचलकरंजी – शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी वाजत-गाजत, तर काही मंडळांकडून पारंपरिक वाद्यांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यात आले. मात्र काही मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे साऊंड सिस्टीमचा वापर करून ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार मंडळांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी स्ट्रक्चर, लेझर लाईट मशीनसह इतर साहित्य जप्त केले आहेत.

Scroll to Top