महाराष्ट्र राज्य बँकेच्या कारभाराची चौकशी करण्याची सहकारी बँक एक्स एम्लॉइज असोसिएशनची मागणी

कोल्हापूर –  राज्य सहकारी बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांवर उदरनिर्वाह भत्यात झालेल्या अन्यायबाबत आणि बँकेच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत सहकारी बँक एक्स एम्लॉइज असोसिएशनने सोमवारी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष खानविलकर यांनी, राज्य बँकेवर दहा वर्षे प्रशासक असून सात वर्षापासून विदयाधर अनास्कर प्रशासक म्हणून काम पाहत असल्याचे सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकेचे भागभांडवल २.८४ कोटीने आणि सहा हजार कोटीच्या ठेवी कमी झाल्याचे सांगितले.

२०१९ पासून आजअखेर प्रशासक असलेल्या अनास्कर यांनी वर्षाला ७५ ते ८५ लाख रूपये भत्ता घेवून राज्य बँकेची कोणती प्रगती केली याची तसेच बँकेच्या कारभाराची सहकार आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी असोसिएशनने केलीय. बँकेतील ८१ कंत्राटी कर्मचाऱ्यांना आणि नियमित सेवेतील ४२६ कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याची योजना राबविण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने मंजूर केला. मात्र १ एप्रिल २०२४ पूर्वी निवृत्त झालेल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. वाढती महागाई, वाढलेला वैदयकीय खर्च विचारात निवृत्त कर्मचाऱ्यांनाही किमान दहा हजार रूपये निर्वाह निधी द्यावा, अशी मागणी खानविलकर यांनी केली. या पत्रकार बैठकीला अशोक देसाई, शशी खानविलकर,  मनमोहन चांदेकर, दिलीप साळवी, प्रदीप पाटील, दिनकर जावळे आदि उपस्थित होते.

Scroll to Top