केंद्रीय निवडणूक आयोगाचा अजब कारभार ; पद्मश्री पुरस्कर्त्यालाच पाठवली एसआयआरची नोटीस

नवी दिल्ली – सध्या देशात एसआयआरची नोंदणी सुरु आहे. या नोंदणीमध्ये निवडणूक आयोगाचा व्यक्तींच्या नावावरून अजब कारभार पहायला मिळत असताना आता आयोगाचा आगळा वेगळा आंधळा कारभार पुढे आला आहे. दक्षिण कन्नडमध्ये वास्तव्यास असलेले हरेकला हजब्बा यांच्याबाबत वेगळाच प्रकार घडला आहे. हरेकला हजब्बा यांना २०२१ मध्ये माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देवून गौरवण्यात आले होते. त्याच हरेकला हजब्बा यांना निवडणूक आयोगाने नावावर आक्षेप घेत नोटीस बजावली आहे.

२००२च्या मतदार यादीत त्यांचं नाव हजब्बा असं नोंद होतं. तर इतर कागदपत्रांवर त्यांचं नाव हरेकला हजब्बा असं आहे. यावर त्यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने तेच मतदार आहेत का? या नावाचे दुसरं कोणी आहे का? याची माहिती घेण्यासाठी नोटीस पाठवली आहे. त्यासाठी त्यांना कागदपत्रे जमा करायला सांगितले आहे. या हास्यास्पद प्रकारामुळे निवडणूक आयोगाबाबत उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.

Scroll to Top