इचलकरंजी – शहरातील बंडगर माळ परिसरातील तारामाई पान शॉपवर रविवारी शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत गुटखा, पान मसाला साठा करुन विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी अब्दुल पोट्टाचोला याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने अमर धडवीर याच्याकडुन गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थ खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर पालिसांनी वेताळ पेठेत छापा टाकला. यात अमर धडवीर याच्या घराजवळ या चारचाकी वाहनात गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थ आढळून आले. त्यामुळे धडवीर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दर्शन चौगुले याच्याकडुन गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थ खरेदी केल्याचे सांगितले. कारवाईत पोलिसांनी पोट्टाचोला आणि धडवीर यांच्याकडुन विविध कंपन्यांचा गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ आणि चारचाकी वाहन असा एकुण २ लाख १९ हजार १४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
इचलकरंजीत गुटख्यावर पोलीसांचा छापा… दोघांना अटक




