कोल्हापूर – करवीर तालुक्यातील सांगवडेवाडी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची सत्ता आहे. या ग्रामपंचायतीचे सरपंच सुदर्शन खोत हे जिल्हा परिषद निवडणूकीत विजयी झाल्यानंतर पद रिक्त झाले होते. खोत त्यांच्या विजयानंतर प्रभारी सरपंचपदी बाबुराव अंगणे यांची निवड झाली होती. सत्ताधारी गटांतर्गत समझोत्यानुसार बाबुराव अंगणे यांनी राजीनाम्यानंतर प्रभारी सरपंच निवडीसाठी गडमुडशिंगीचे मंडलाधिकारी सुरेश टिपुगडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत प्रभारी सरपंचपदी पोपट सिध्दनुर्ले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर पोपट सिध्दनुर्ले तसेच मावळते प्रभारी सरपंच बाबुराव अंगणे यांना सन्मानीत करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी नूतन प्रभारी सरपंच पोपट सिध्दनुर्ले यांचे अभिनंदन करत त्यांना यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रभारी सरपंच पोपट सिध्दनुर्ले यांनी सर्वांनी मिळून गावाचा विकास करुया, गांव प्रगतीपथावर नेऊया, असे आवाहन केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, अनिकेत जाधव, बाबुराव आंगणे, सपना चौगुले, सुषमा वडर, अलका शिंदे, माजी सरपंच बाळासाहेब खोचगे, पांडुरंग वडर, तातोबा हुजरे, कांतिनाथ हुजरे, शितल खोत, विनोद चौगुले, अण्णासाहेब खोत, महादेव खोचगे, ग्रामपंचायत अधिकारी तब्बसूम अत्तार, तलाठी नितीन पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.




