गणेशोत्सवासाठी एक खिडकी योजना सुरू…

मंडळांना मिळणार एकाच ठिकाणी सर्व परवाने

कोल्हापूर – गणेशोत्सव अवघ्या तीन आठवड्यांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गणेशोत्सवासाठीची तयारी सुरू झाली आहे. या मंडळांना मंडप उभारणी, गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना, आगमन मिरवणूक, विसर्जन मिरवणूक, साऊंड सिस्टिम लावणे. यासाठी परवानगी घ्यावी लागते यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या कार्यालयात जाऊन हेलपाटे मारायला लागू नयेत. यासाठी, कोल्हापूर पोलीस दल आणि महापालिकेच्यावतीने हे सर्व परवाने एकत्रितरित्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यानुसार शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात हे परवाने घेण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. १३ सप्टेंबरपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.

Scroll to Top