कोल्हापूर – बेळगावमधील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबच्या माध्यमातून १५ ऑगस्ट रोजी रंकाळा येथील सचिन टीम टॉपर्स रोलर स्केटिंग अकॅडमीमध्ये वन नेशन मेनी ड्रीम्स या शीर्षकाखाली सलग पाच तासांच्या स्केटिंग मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. दिलीप यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत चार वर्षांपासून ते पंधरा वर्षांपर्यंतच्या ३३ मुला मुलींनी सहभाग नोंदवला होता.
सर्व खेळाडूंनी सलग पाच तास स्केटिंग करून चार वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये आपल्या विक्रमाची नोंद केली. या पाच तासांमध्ये जवळपास ९० किलोमीटरचे अंतर खेळाडूंनी पूर्ण केले. सर्व सहभागी खेळाडूंना उपस्थित पालकांच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या सर्व खेळाडूंना खराडे कॉलेजचे अध्यक्ष अजित खराडे, ध्रुवराज खराडे, अमरस सरनाईक, ज्योति चिंडक, निखिल चिंडक, प्रशिक्षक शुभम पाटील, व्यवस्थापक संतोष पवार-देसाई, प्रमोद मेहता, विनायक निकम यांच्यासह पालकांचे मार्गदर्शन लाभले.



