इचलकरंजी महापालिकेची उद्या सर्वसाधारण सभा…

‘या’ मुद्दयांवरून सभा गाजणार

इचलकरंजी – शहरातील महापालिकेची सर्वसाधारण सभा उद्या, गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणार आहे. या सभेत एकूण ३९ विषयावरांवर चर्चा होणार आहे. शहरातील विकास कामे संथगतीने सुरू असून या विषयावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी विरोधी सदस्यांनी केली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या खड्ड्यांवरूनही विरोधक आक्रमक भूमिका घेणार अशी चिन्हे आहेत. त्यामुळे या दोन विषयांवरून ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Scroll to Top