पेठवडगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अभिजित गायकवाड यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर – पेठवडगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जवाहर सलगर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी पालिकेच्या विजयसिंह यादव सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रियेला सुरूवात झाली. यावेळी अभिजित गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपनगराध्क्षपदी बिनविरोध झाल्याचे नगराध्यक्षा पोळ यांनी जाहीर केले. या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, नगरसेवक गुरुप्रसाद यादव, प्रविण पाटील, विशाल वडगांवे, निवास धनवडे, मिलिंद सनदी, शीतल कोळी, सुषमा पाटील, सुरेखा अनुसे, कल्पना भोसले, सुमन कोळी, धनश्री पोळ, वर्षा पोवार आणि रूपाली माने यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

Scroll to Top