इचलकरंजी – शहरातील विविध प्रश्नांवर गेल्या महिन्यात शिवशाही विकास आघाडीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. होते. त्यावेळी महाविकास आणि शिवशाहू विकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार राहुल आवाडे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत आमदार आवाडे यांच्याकडून आंदोलनकर्त्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने आज महाविकास आणि शिव शाहू आघाडीच्यावतीने पत्रकार बैठक घेऊन खुलासा करण्यात आला. संविधानाने दिलेल्या अधिकाराने आणि सनदशीर मार्गाने आम्ही आंदोलन केले. त्या आंदोलनावर आमदार राहूल आवाडे यांनी आक्षेप घेणे चुकीचे असल्याचे आघाडीच्यावतीने सांगण्यात आले. आम्ही केवळ शहर वासियांना भेडसावणारे प्रश्न मांडत आहोत. आम्ही केवळ प्रश्नांना वाचा फोडली म्हणून वैफल्यग्रस्त होऊन आमदार आवाडे यांनी आम्हाला नोटीसा काढल्या बड्या नेत्यांना आणायचे, कार्यक्रम करायचे आणि जनतेची दिशाभूल करायची हे काम त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
ज्याला राजकारणात मान अपमान सहन होत नाही त्यांनी राजकारणात राहू नये, असा सल्ला आमदार आवाडेंना देत महाविकास आणि शिव शाहू विकास आघाडीच्या नेत्यांनी आम्ही यापुढंही लोकशाही आणि सनदशीर मार्गाने आंदोलन करू, असा इशारा दिला.
या पत्रकार बैठकीला विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, संजय कांबळे, शशांक बावचकर, संजय तेलनाडे, अमरजीत जाधव, नंदकुमार पाटील, नितीन कोकणे, रवी गोंदकर, सदा मलाबादे, अब्राहम आवळे, राजू आलासे, राजेंद्र लोखंडे, युवराज शिंगाडे, झाकीर जमादार आदी उपस्थित होते.




