इचलकरंजी – गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ होत असल्याने प्रमुख रस्ते, चौक, फुटपाथ आणि सार्वजनिक मार्ग मोकळे ठेवण्याच्या सूचना इचलकरंजी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी शॉपिंग सेंटर परिसरातून व्यंकटराव हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेले फळ विक्रीचे अतिक्रमण हटविण्याबाबत संबंधित फळ विक्रेत्याला सूचना करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष श्रीकांत आवळे यांनी सूचना दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. तसेच ठार मारण्याची आणि आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे अतिक्रमण विभाग प्रमुख आवळे यांनी १५ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
इचलकरंजी शहरात अतिक्रमण हटवताना अधिकाऱ्यांना धमकी…




