राजारामपुरीतून महागडी कार गेली चोरीला…

कोल्हापूर –  शहरातील राजारामपुरी येथून महागडी कार चोरीला गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 महेश बाळासाहेब भोसले हे राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एनसीसी भवन समोर असलेल्या मल्हार रेसिडेन्सीमध्ये राहतात. रविवारी मल्हार रेसिडेन्सीसमोर पार्किंग केलेली भोसले यांच्या मालकीची सुमारे ३० लाख रुपये किंमतीची कार अज्ञाताने चोरून नेली आहे.  या प्रकरणी भोसले यांच्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Scroll to Top