कोल्हापूर – आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पणन मंत्री जयकुमार रावल हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी भेट दिली. दरम्यान त्यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.
यावेळी मंत्र्यांनी पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाला यावेळी उजाळा दिला. यावेळी डॉ. संजय पाटील, आ. सतेज पाटील यांच्यासह खासदार राजाभाऊ वाझे,आमदार शिवाजी पाटील,आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव, नाथाजी पाटील, मनपा विरोधी पक्षनेते राजू लाटकर आदी उपस्थित होते.




