शिवराज्याभिषेक सोहळ्यातील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी कारवाई करा : संयुक्त जुना बुधवार पेठ मंडळाची मागणी

<p>शिवराज्याभिषेक सोहळ्यातील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी कारवाई करा : संयुक्त जुना बुधवार पेठ मंडळाची मागणी</p>

कोल्हापूर - शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी झालेल्या शिवभक्तांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मिडीयातून प्रसारीत करणाऱ्या लौकिक गोळे याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी मंडळाने केली आहे.

 या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद खाडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. शिवभक्तांच्या भावना दुखावणारे व्हिडिओ व्हायरल करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लौकीक गोळे याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष आणि माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, संदीप देसाई, सुशील भांदीगरे, अविनाश साळोखे, गणेश जाधव, संजय गायकवाड, रणजित पाटील, अभिजित पाटील, अक्षय बुचडे, शक्ती चिले, आदित्य दळवी, शुभम रोकडे, वल्लभ पाटील, प्रथमेश परीट आदी उपस्थित होते.