भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यांने दिला राजीनामा 

<p>भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यांने दिला राजीनामा </p>

नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते जॉर्ज कुरियन हे मध्य प्रदेशचे राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राज्यसभेचा ६ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी न दिल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. हा राजीनामा  राष्ट्रपती भवनाने स्वीकारला आहे. 
जॉर्ज कुरियन यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारली जाणार याची पूर्वकल्पना नव्हती. पक्षाने ४ जून रोजी जाहीर केलेल्या ११ उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.