ड्रग्ज विरोधात कारवाई करण्याचे टास्क फोरमला मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई - आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ड्रग्ज विरोधात कारवाई करण्याचा आदेश टास्क फोरमला दिला आहे.
अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि, राज्यात चार महिन्यात 254 कोटी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. १५ विभागांना एकत्र करून अंमली पदार्थ विरोधात मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून दुसऱ्या राज्यात जाऊन कारवाई करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये जे पोलिसात सापडले आहेत त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ड्रग्जची साखळी शोधून कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर आ. जयंत पाटील यांनी, राज्यात ड्रग्जसारखा गोष्टी घडत आहेत हे अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे.