क्राईम

अनधिकृत रॅपिडो अॅपद्वारे व्यवसाय करणाऱ्या ‘इतक्या’ बाईक टॅक्सी वाहनांवर दंडात्मक कारवाई…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

५ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल

कोल्हापूर – जिल्ह्यात आवश्यक वैध अॅग्रीगेटर परवाना नसताना रॅपिडो (Rapido) अॅपद्वारे दुचाकी वाहनांचा वापर करून प्रवासी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत ५७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ५ लाख ८८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच संबंधित वाहनांवर १५ दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी दिली आहे.

यापुढे अनधिकृत रॅपिडो अॅप अथवा वैध अॅग्रीगेटर परवाना नसलेल्या अन्य कोणत्याही अॅपद्वारे प्रवासी वाहतूक व्यवसायासाठी वाहनाचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित वाहनमालक, वाहनधारक आणि चालकांविरुद्ध मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ६६ (१) व १९२-अ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. वैध परवान्याशिवाय प्रवासी वाहतूक व्यवसायासाठी वाहनाचा वापर केल्यास संबंधित चालक तसेच अशा वापरास परवानगी देणाऱ्या वाहनमालकास १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

संबंधित विषय

Scroll to Top