आरोग्य

अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या “ब्लूम डेंटल अँड इम्पलांट क्लिनिक”चे ताराबाई पार्कात उदघाटन…

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – शहरातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आणि वेदनारहित दंत उपचार सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, या उद्देशाने डॉ. चैत्राली करण काकडे यांनी कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरात “ब्लूम डेंटल अँड इम्पलांट स्टुडिओ” हे अत्याधुनिक दंत रुग्णालय सुरू केले आहे. याचे उद्घाटन इंडियन अकॅडमी ऑफ थिस्टिक अँड कॉस्मेटिक दंत चिकित्सालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदेश मयेकर आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. संदेश मयेकर यांनी १९९० मध्ये नवी मुंबईतील पहिल्या डेंटल कॉलेजच्या संलग्नतेच्या तपासणीपासून ते सन २००० मधील शैक्षणिक कार्यक्रमांपर्यंत डॉ. डी. वाय. पाटील समूहासोबतचा प्रदीर्घ प्रवास कथन केला. दंतोपचार महाग नसतात, तर आपण वेळेवर न गेल्यामुळे ते महाग होतात. वाहना प्रमाणं तोंडाचे देखील नियमित सर्व्हिसिंग करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत जगायचे आहे, तोपर्यंत अन्न खावे लागेल आणि अन्न पचवण्यासाठी ते चावून खाणे गरजेचे आहे, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. पचनाची प्रक्रिया तोंडापासून सुरू होते. त्यामुळे दात नसतील तर दर ५ वर्षांनी प्रकृतीचा १० पटीने ऱ्हास होतो. नियमित तपासणीमुळे दात स्वच्छ राहतातच, शिवाय ‘ओरल कॅन्सर’ होण्यापूर्वीच्या अवस्थेतच त्याचे निदान होऊन रुग्ण वाचू शकतो. देवाने आपल्याला एकच तोंड दिलय, त्याची नीट काळजी घ्या, असा मोलाचा संदेश देत डॉ. संदेश मयेकर यांनी भाषणाचा समारोप केला.

 आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना सध्या सर्व क्षेत्रात एआय  आले आहे पण डेंटल इम्पलांट क्षेत्रात अद्याप एआय नाही. किंबहुना त्याचा या क्षेत्रात फारसा उपयोग होत नाही. केवळ निदान करण्यासाठी त्याचा उपयोग होत असल्याचे सांगितले. ब्लूम डेंटल

क्लिनिकच्या माध्यमातून कोल्हापूरातील नागरिकांसाठी चांगली सेवा उपलब्ध झालीय त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर डॉ. चैत्राली करण काकडे यांनी या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शांतादेवी डी पाटील, राजश्री मेघराज काकडे, मेघराज काकडे, करण काकडे, प्रदीप पालशेतकर, भाग्यश्री पाटील, शनील महागावकर, योगक्षीला महागावकर, गीतादेवी जाधव, स्मितादेवी जाधव, पृथ्वीराज पाटील, वृषाली पाटील, तेजस पाटील, नगरसेवक राजेश लाटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top