मनोरंजन

‘बच गए’ : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विट

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कट आखला जात होता. याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासादरम्यान गोळीबाराच्या कटाशी दोन संशयितांचा संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार दिल्ली पोलिसांनी दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले आहे. गोळीबाराचा हा कट उधळण्यात आल्याचे समोर आल्यानंतर अभिताभ बच्चन यांनी ‘बच गए’ असे ट्विट केले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबार करण्याच्या कटामागील कारण तपास यंत्रणांकडून शोधले जात आहे. परंतु १९८४मधील शीखविरोधी दंगलींच्या संदर्भात अमिताभ बच्चन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना लक्ष्य करण्याचा कट आखण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top