राजकीय

पूर्वी नेता तिथे निष्ठा अशी परिस्थिती होती, पण आता सत्ता तिथे पत्ता अशी परिस्थिती झालीय : आ. सतेज पाटील

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – पूर्वी नेता तिथे निष्ठा अशी परिस्थिती होती, पण आता सत्ता तिथे पत्ता अशी परिस्थिती आहे.अशा परिस्थितीतही तुम्ही सगळे माझ्यासोबत राहिलात हे महत्त्वाचं आहे.असं प्रतिपादन आ. सतेज पाटील यांनी केले आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहकार्यातून कळंबा ग्रामपंचायतीच्यावतीने स्वनिधितून 23 लाख रुपये खर्च करून 10 दुकान गाळे बांधण्यात आले आहेत. याचे उद्घाटन आमदार सतेज पाटील,आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . यावेळी ते बोलत होते.

मावळलेला सूर्य कधीतरी उगवत असतो हे लक्षात ठेवा. आपण सगळे एकसंघ राहूयात असं सांगून या पुढच्या काळात देखील कळंबा आणि परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी कळंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन गुरव, उपसरपंच मीनाक्षी गौड, ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव, रोहित मिरजे, विकास पवार, संदीप पाटील, रोहित जगताप, सोनल शिंदे, पुनम जाधव, आशा टिपुगडे, स्नेहल जाधव, वैशाली टिपुगडे, दिपाली रोपळकर, संगीता माने, ग्रामविकास अधिकारी विलास राबाडे, माजी नगरसेवक मधुकर रामाने, करवीरचे माजी सभापती दिलीप टिपुगडे, यशवंत शिंदे बिद्री कारखान्याचे संचालक एस बी पाटील, अरुण टोपकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top