क्राईम

पाचगावातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा… १३ जणांविरोधात गुन्हा

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – पाचगावमधील गाडगीळ कॉलनीतील प्रदीप गाडगीळ यांच्या रिकाम्या प्लॉटवर असलेल्या बंदिस्त पत्र्याच्या शेडमध्ये तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने करवीर पोलिसांनी आज छापा कारवाई करत जुगार खेळणाऱ्या बारा जणांसह जागा मालक प्रदीप गाडगीळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सागर हवालदार, रवी भोसले, ज्ञानेश्वर कांबळे, प्रमोद इंगवले, दत्तात्रय इंगवले, विशाल पवार, उत्तम हवालदार, शिवाजी हवालदार, नितीन पाटील, प्रदीप गुरव, अनिल इराचे, विशाल खेतल अशी त्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून १३ मोबाईल संच, रोकड आणि सहा मोटरसायकली असा तीन लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top