कोल्हापूर – एसटी बस मधून चौघेजण बेकायदेशीरपणे गोवा बनावटीचे मद्य कोल्हापूर बसस्थानकात घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दुपारी मध्यवर्ती बस स्थानकात सापळा रचून कणकवली पुणे एस टी बस मधून आलेल्या चौघांना ताब्यात घेवून तपासणी केली. यावेळी त्या चौघांच्या बॅगेत गोवा बनावटीचा मद्यसाठा मिळून आला. श्यामकुमार मुलचंदानी, धुला रॉय देवकी रॉय, रामेश्वर शिंदे, राम रॉय मदन रॉय अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ५२ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा आणि दोन मोबाईल संच असा सुमारे एक लाख अकरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



