क्राईम

रंकाळा स्थानकात गाडीत चढताना महिलेच्या गळ्यातील चेन लंपास…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील बाचणी मधील विनिता शिवाजी गायकवाड या बुधवारी दुपारी कामानिमित्त कोल्हापुरात आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमाराला त्या गावी जाण्यासाठी रंकाळा बसस्थानकात उभ्या होत्या. गाडीमध्ये चढताना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेत विनिता गायकवाड यांच्या गळ्यातील अर्धा तोळे वजनाची सुमारे सोन्याची चेन हातोहात लंपास केली आहे. या प्रकरणी विनिता शिवाजी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञाता विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.

संबंधित विषय

Scroll to Top