कृषी

“…शेतकरी पत्ते खेळणे, गुटखा खाणे, दारू पिणे आणि गांजा ओढणे यात दिवस घालवतात,” : भाजपचे खासदार शेतकऱ्यांबाबत पुन्हा बरळले

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मऊगंज – सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून वारंवार शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं जातं आणि चुकांची उपरती झाल्यानंतर लगेच माफी मागितली जाते, असा सिलसिला सध्या राजकारणात सुरु झाला आहे. अशा प्रकारे मध्य प्रदेशातील रेवा मतदारसंघाचे भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा यांनी एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
खासदार जनार्दन मिश्रा यांनी बोलताना, “शेतकरी वर्षातील केवळ तीन महिनेच शेतात राबतात आणि उरलेले नऊ महिने पत्ते खेळणे, गुटखा खाणे, दारू पिणे व गांजा ओढणे यात घालवतात”, असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे . त्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका होवू लागल्यानंतर त्यांनी, जाहीर माफी मागितली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top